मंचर / पारगाव शिंगवे -आंबेगाव तालुक्यातील 104 गावांमध्ये मंगळवारी (दि. 31) आयोजित महा लसीकरण मोहिमेत दुपारी तीन वाजेपर्यंत 25 हजार नागरिकांनी लसीकरण करून घेतल्याची माहिती प्रांताधिकारी सारंग कोडोलकर यांनी दिली.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूल आरोग्य, पंचायत समितीच्या सहकार्याने तालुक्यात करोना लसीकरण मोहिम राबविण्यात आली. मंचर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिवसनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा,
भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भाजप जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात, पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले, मंचरच्या सरपंच किरण राजगुरु, उपसरपंच युवराज बाणखेले, घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे यांनी विविध गावांमध्ये भेटी देवुन करोना लसीकरणाचा आढावा घेतला. तहसीलदार रमा जोशी,
गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने, सल्लागार डी. के. वळसे पाटील, ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजणे यांनी लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई मंत्रालयातुन तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संपर्क करुन लसीकरण मोहिमेस प्रतिसाद द्यावा. असे आवाहन केले. शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी करोना लसीकरणामध्ये सहभागी झालेल्या सुमारे 2 हजार 200 स्वयंसेवकांची जेवणाची व्यवस्था संबधित केंद्रावर केल्याची माहिती कोडोलकर यांनी दिली.