मंचर : पारगाव (ता.आंबेगाव) येथे दिव्यांग शेतकरी दत्तात्रय नामदेव लोखंडे यांनी आपल्यावर शासकीय अधिकाऱ्र्याकडून अन्याय होत असल्याने विविध मागण्यासाठी मंगळवार, दि.२५ रोजी उपोषणासाठी बसले आहे.
याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात उपोषणकर्ते दिव्यांग शेतकरी दत्तात्रय लोखंडे यांनी म्हंटले आहे की, निरगुडसर,बेटवस्ती, दातखिळेमळा, माळीमळा हा इंग्रजकालीन रस्ता हा रस्ता पुर्वी एस.टी. बसचा मार्ग होता, हा रस्ता मुळ रेकॉर्ड व नकाशा प्रमाणे आखणी करून करण्यात यावा.
रस्त्याबद्दल घोडेगाव न्यायालयामध्ये १५६/२०२१ दावा चालु असताना जो रस्ता ग्रामपंचायत व तहसीलदारांनी जा.क्र. जमीन /कावि/३६८/२०२२ घोडेगाव दि.१५/११/२०२२ हे पत्र देऊन पोलीस संरक्षण घेऊन आमच्या हद्दीत अतिक्रमण केले. ते आम्हास काढून मिळावे. बेटवस्ती, दातखिळेमळा, माळीमळा या रस्त्यावरील सर्व असणारी अतिक्रमणे हटवून मुळ रेकॉर्ड व नकाशाप्रमाणे रस्ता करुन रस्त्याच्या दोन्ही बाजुने गटारे करुन रस्ता करण्यात यावा. जावक क्र. / रस्ता क्र./५/ एस आर/५/२०२० घोडेगाव दि.३१/१२/२०२१ प्रमाणे तहसीलदार यांचे आदेशाचे पालन न झाल्यामुळे त्या रस्त्याचे कामकाज जाणून बुजून होत नाही.
ते करुन मिळावे.या मागणीसाठी दिव्यांग शेतकरी दत्तात्रय लोखंडे यांनी पारगाव येथील स्वत:च्या क्षेत्रातील शेडमध्ये उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या मागणीचा रास्तविचार व्हावा.अन्यथा आंबेगाव तालुका तहसील कार्यालय घोडेगाव येथे दिव्यांग बांधवाना उपोषणाला बसावे लागेल. असा इशारा पुणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या नऊ संघटनांनी दिला आहे. दरम्यान उपोषण स्थळी पारगाव पोलिसांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांचे म्हणणे समजून घेतले. अशी माहिती उपोषणकर्ते दत्तात्रय लोखंडे यांचे चिरंजीव अशोक लोखंडे यांनी दिली.