घोडेगावत प्रथम खर्च तपासणी पूर्ण
मंचर – आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील खर्च निरीक्षक व्यंकटेश बाबू यांच्या प्रमुख उपस्थितीत व निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांचे अध्यक्षतेखाली 11 उमेदवारांची प्रथम खर्च तपासणी घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे पार पडली. यात दोन उमेदवारांना खर्चात किरकोळ तफावत आढळून आली आहे.
या तपासणी दरम्यान सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय नागाटिळक, पुणे कार्यालयाचे सहायक खर्च निरीक्षक मुख्यालय जिल्हाधिकारी संदीप ओव्हाळ, सहायक खर्च निरीक्षक नंदू पाचंगे, उमेदवार खर्च ताळमेळ समितीचे पथक प्रमुख विजय दांगट, उमेदवार खर्च ताळमेळ समितीमधील सदस्य, सर्व 11 उमेदवार व त्यांचे खर्च प्रतिनिधी उपस्थित होते.
खर्च ताळमेळ प्रकियेदरम्यान दोन उमेदवारांच्या खर्चात किरकोळ तफावत आढळून आली. दोन उमेदवारांना खर्च निरीक्षक व्यंकडेश बाबू यांनी दुरुस्तीच्या सूचना केल्या व अशी तफावत पुढे होऊ नये असे सूचित केले.
एक उमेदवाराने गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतची माहिती प्रसिद्ध न केल्याने ती वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याची सूचना केली. सर्व उमेदवारांच्या निवडणूक विषयांच्या खर्चाची दुसरी तपासणी बुधवारी (दि. 13) तर तिसरी तपासणी रविवारी (दि. 17) होईल असे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.