संभाजीराव झेंडेंच्या प्रचारार्थ व्हिडिओ कॉन्फर्सद्वारे साधला जनतेशी संवाद
सासवड येथे पार्थ पवार यांच्या उपस्थितीत पदयात्रा
सासवड – संभाजीराव झेंडे यांना पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांची जाणीव आहे. गुंजवणीचे पाणी पुरंदरला आल्याशिवाय पुरंदरचा विकास होणार नाही. एमआयडीसीचे विस्तरीकरण झाल्यानंतर तरुणांना रोजगार मिळेल. लोकांना विश्वासात घेऊनच व विमानतळाचा प्रश्न मार्गी लावला जाईल. पुणे मेट्रो सासवड ते उरळीकांचन पर्यंत पुढे घेऊन जाणार आहोत. हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मजबूत लोकप्रतिनिधी पाहिजेत. विधानसभेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संभाजीराव झेंडे यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
सासवड (ता. पुरंदर) येथील हुंडेकरी चौकामध्ये माजी सनदी अधिकारी व राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराव झेंडे यांच्या पदयात्रेसाठी पार्थ अजित पवार उपस्थित होते. यानंतर सांगता सभेसाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडिओ कॉन्फर्सद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी पांडेश्वरचे विद्यामान सरपंच वैभव थिकोळे, जेजुरी शहर अखिल भारतीय सेनेचे अध्यक्ष पवन आकडे रवी निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी आमदार संभाजी कुंजीर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश घुले,
जिल्हा परिषदेचे माजी सैनिक सदस्य योगेश फडतडे, पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष वामन जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष अमित झेंडे, उत्तम धुमाळ, बाळासाहेब कामथे, कैलास जगताप, शेखर पिसे, बाळासाहेब भिंताडे, संदेश पवार, वंदना जगताप, अजित सोनवणे, संदीप जगताप, दशरथ यादव, सागर काळे, चेतन मेमाने, बबन टकले, शामकांत भिंताडे, दिलीप थोपटे, नलिनी कामठे, प्रतीक्षा बाजारे, प्राची देशमुख, भैय्या खैरे राजेंद्र धुमाळ, उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संभाजी झेंडे यांच्या पाठीमागे पूर्णपणे ताकतीने उभी राहील असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुरंदर तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे यांनी सांगितले.
आजी-माजी आमदारांनी जनतेशी खोटे बोलण्याचा घाट घातला आहे. आदर्श घोटाळा नगर विकास विभागाचा होता माझा काही संबंध नाही. आरोप करताना अभ्यास करणे गरजेचे आहे. आम्ही पुढे जेजुरी एमआयडीसीचे विस्तारीकरण करणार, हॉस्पिटल काढणार, टुरिझम वाढवणार, गुंजवणीचे पाणी पुरंदरमध्ये आणणार, नागरिकांना विश्वासात घेऊन विमानतळ करणार आहे. तसेच आता परिवर्तन हे अटळ आहे.
– संभाजीराव झेंडे, उमेदवार, राष्ट्रवादी
गुंजवणीचे गाजर गेले अनेक वर्षे पुरंदरचे जनतेला दाखवले जाते. सासवड-सुपा रस्त्यासाठी 350 कोटी रुपयांचे टेंडर अजित पवार यांनी दिले पुरंदरचा विकास करायचा असेल तर संभाजी झेंडे यांना निवडून द्यावे लागेल. तालुक्यामध्ये एकच शैक्षणिक कॉलेज आहे. बड्या बड्या माता मारणार्यांना घरी बसवा.
– दत्ता झुरंगे, माजी सदस्य, जिल्हा परिषद