पीडीसीसी बॅंकेच्या स्थलांतरित शाखा, एटीएमची केली पाहणी
वाल्हे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाल्हे (ता.पुरंदर) गावाला धावती सदिच्छा भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी वाल्हे गावातील शाहू-फुले-आंबेडकर अभ्यासिकेची पाहाणी करून, या अभ्यासिकामध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून, या विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरद्वारे लेक्चर देणाऱ्या शिक्षकांशी संवाद साधला.
यावेळी आमदार संजय जगताप, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, विजय कोलते, जयदीप बारभाई, वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे, प्रा. अनिल भुजबळ, प्रा.संतोष नवले, दीपक कुमठेकर, संदेश पवार, सूर्यकांत भुजबळ, हनुमंत पवार, शिक्षक अनिल दुर्गाडे, विशांत ठाकुर, अतुल गायकवाड, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर पवार यांनी स्थलांतरी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे स्थलांतरित शाखेची व एटीएमची ही पाहणी केली. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्षा अर्चना घारे, संचालक भालचंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाणच सरव्यवस्थापक विजय टापरे, सहायक सरव्यवस्थापक सुनील खताळ, विभागीय अधिकारी महेश खैरे, अनिल उरवणे, जयेश गद्रे, वाल्हे शाखा प्रमुख संतोष दुर्गाडे, विकास अधिकारी पवन दुर्गाडे, पुरंदर तालुका सेवक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, शाखेच्या कामाची बारकाईने पाहणी करून, उत्कृष्ट काम केल्याबद्दल संबंधित ठेकेदाराचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक करून त्यांचा सन्मान केला. शाखेसाठी कमी खर्चामध्ये शाखेचे सर्व काम उत्कृष्ट प्रतिचे करून, घेतल्याने उपमुख्यमंञी अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, वाल्हे येथील प्रशस्त अशी अभ्यासिका व अभ्यासिकेमध्ये असलेल्या ऑनलाइन शिक्षणासहीत, ऑफलाइन अनेक विषयांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आल्याने, प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. अजित पवार यांनी पाहणी केलेल्या दोन्ही कामांमध्ये कोणतीही चूक काढली नाही. तसेच त्यांनी विशेष करून कामाचे कौतुक केल्याने, सर्वांनी आनंद व्यक्त केला.