वाघोली : केसनंद तालुका हवेली जिल्हा पुणे या गावचे रेशनिंग धान्य वाटप वाघोली येथे होत असल्याने केसनंद गावातील नागरिकांना रेशनिंग चे धान्य घेण्यासाठी वाघोली येथे जावे लागत होते.
याबाबत पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते श्रीकांत पाटोळे यांनी केसनंद गावचे रेशनिंग धान्य वाटप केसनंद मध्येच व्हावे व नागरिकांची गैरसोय तातडीने दूर करण्याची मागणी केली होती.
यानुसार हवेलीचे तहसीलदार यांना याबाबत योग्य त्या उपाय योजना करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले आहेत. श्रीकांत पाटोळे यांच्या मागणीमुळे गोरगरीबांना केसनंद गावातच रेशनिंग धान्य मिळण्याचा मार्ग आता सुकर बनला आहे.