बारामती – बारामती ज्येष्ठ नागरिक निवास संस्थेतील निवासींना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. संस्थेत 90 वर्ष पेक्षा जास्त वय असणाऱ्या दोन निवासींचा व संस्थेत मागील 10 वर्षापेक्षा जास्त दिवस राहणाऱ्या पाच निवासींचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवासी वर्गणीमध्ये दरमहा 500 रुपये सूट देण्यात आली.
यावेळी संस्थेत 95 वर्ष वय असणारे विष्णू पांडुरंग कट्टी व मागील 17 वर्षापासून संस्थेत राहणारे शरद रावचंद गांधी यांनी आपले संस्थेप्रती मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र बोरावके, संस्थेचे सेक्रेटरी किशोर मेहता, संस्थेचे विश्वस्त व आर्किटेक्ट अभय शहा व संस्थेतील निवासी उपस्थित होते.