कारेगावात दर्जेदार गुणवत्तेचे दालन
रांजणगाव गणपती – कारेगाव (ता. शिरूर) येथे अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या शिवांश गोल्ड या सोन्या-चांदीच्या सराफ पेढीत दसरा व दिवाळी बरोबरच इतर दिवशीही ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असतो. दुकानांमध्ये ग्राहकांना चांगल्या दर्जाचे सोने व चांदी मिळत आहे.
शिवांश गोल्ड दुकानाचे संचालक राहुल सुभाषचंद्र सोनी यांनी दि. १७ मार्च २०२२ रोजी कारेगाव येथे शिवांश गोल्ड या आपल्या व्यवसायाची शाखा सुरू केली. रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील कामगार व अधिकारी वर्ग, रांजणगाव व कारेगाव परिसरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात. दुकानांमध्ये सोन्या चांदी बरोबरच गुणवत्ताही मिळत आहे.
सोन्याची व चांदीची शुद्धता तपासण्याची सुविधा रांजणगाव कारेगाव परिसरामध्ये शिवांश गोल्डमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे महिलावर्ग या ठिकाणी सोने खरेदी करत आहे. सोने खरेदीवर दहा टक्के मजुरी, कमीत कमी वजनाची उपलब्ध ज्वेलरी, सरकार मान्य प्राप्त एच यू आयडी मार्कड सोने उपलब्ध आदी सुविधा शिवांश गोल्डमध्ये उपलब्ध असल्याचे शिवांश गोल्डचे संचालक राहुल सोनी यांनी सांगितले.