दावडी : दापोडी, पुणे येथील श्रीमती सी. के. गोयल कला वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाविभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर खेड तालुक्यातील दुर्गम भागातील चिंचबाई वाडी येथे उत्साहात संपन्न झाले. शिबिरामुळे चिंचबाई वाडी गाव संपूर्ण चाकचक झाले.
शिबिरात सकाळ सत्रात श्रमदान, दुपार सत्रात व्याख्यानमाला, सायंकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. मदान अंतर्गत परिसर स्वच्छता, 820 वृक्षाची लागवड, वनराई बंधारा, शोष खड्डे आदी कामे करण्यात आली.
आरोग्य शिबिर, ग्रामसर्र्व्हेे, शिवार फेरी, खेळ, व्यायाम, प्रार्थना, ध्यानधारणा, मनोरंजन, समाज प्रबोधन, जनजागृती, प्रभात फेरी, दिंडी यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.
संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमात खेळ रंगला पैठणीचा, समोहन, गावातील शालेय मुलांचे व शिबिरार्थींचे ग्रुप, वैयक्तिक डान्स, मॉडेल्स, समाज प्रबोधन प्रसंग नाट्य, मिमिक्री या कार्यक्रमांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिर चांगले झाल्यामुळे ग्रामस्थांनी शिबिरार्थींना मासवडी पदार्थाचे जेवण दिले.