नीरा – नीरा (ता. पुरंदर) येथे नीरा आणि परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने नीरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आल आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी एक डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्याच मराठा समाजाला आवाहन केले होते. यानुसार नीरा येथील मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे.
नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आजपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवार (दि.१) सकाळी अकरापासून. उपोषणाला सुरवात करण्यात आली. यावेळी नीरा येथील पोलिसांना याबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी मराठा आंदोलक तुळशीराम जगताप, सचिन मोरे, महेश जेधे, सुरेंद्र जेधे, अंकुश जगताप, मराठा बांधव उपस्थित होते. जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी लढत असून त्यांचा आंदोलनात संपूर्ण मराठा समाज सहभागी आहे. जरांगे जे आणि जशा पद्धतीने आंदोलन करण्यास सांगतील त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत.
जरांगे हे लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत. त्यामुळे संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी असल्याचे यावेळी सुरेंद्र जेधे व सचिन मोरे यांनी म्हटले आहे. यावेळी शांततेच्या व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.