संभाजीराव झेंडे : घड्याळालाच मतदान करण्याचा दिला नारा
कोंढवा – आंबेगाव (ता. हवेली) भागामध्ये गेली 15 वर्षे नागरी समस्यां सोडविण्याच्या मानसिकतेचा अभाव आहे. लोकप्रतिनिधींच्या मार्फत ज्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात त्या समस्या सोडवण्याची मानसिकता यापूर्वी नव्हती.
राज्य शासन दरबारी असणारे सर्वप्रश्न मी मार्गे लावू शकतो, असे आश्वासन पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संभाजीराव झेंडे यांनी व्यक्त केले.
पुरंदर-हवेली मतदारसंघातील आंबेगाव येथे विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक युवराज बेलदरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या मेळाव्याला युवा कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. तर आंबेगावकर घड्याळालाच मतदान करणार असा नारा सर्वांनी यावेळी दिला.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे सरचिटणीस राहुल चोरघडे, नगरसेवक संतोष फरांदे, पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक युवराज बेलदरे, युवराज वासवंड, आप्पासाहेब परांडे, किसनराव नांगरे, पल्लवीताई जगताप, सुरेखा कहाणे, डिंपल इंगळे, हिरालाल धुमाळ आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.