व्यापार्यांशी साधला संवाद : मतदानरुपी मागितला आशिर्वाद
नारायणगाव : जुन्नर विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी नारायणगाव शहरात प्रचार रॅली काढून व्यापार्यांशी संवाद साधला. यावेळी तरुण कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी झाले होते.
नारायणगावचे ग्रामदैवत श्री हनुमान देवस्थान, श्री मुक्ताई देवस्थान, पूर्वेशीवरील श्री छत्रपती शिवाजी महाराज, बस स्थानकावरील तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग यांच्या पुतळ्याला हार घालून आशीर्वाद घेतले. नारायणगाव शहरातील मुख्य बाजारपेठ, खोडद चौक, बस स्थानक परिसरातील सर्वसामान्य जनतेची, व्यापार्यांची भेट घेऊन मतदान रुपी आशीर्वाद मागितला.
प्रचार रॅलीत ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रोहिदास केदारी, श्रीराम पतसंस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत वाजगे, संचालक अनिल थोरात, अनिल डेरे, सुनील श्रीवत, मंगेश रासने,अजिंक्यतारा पतसंस्थेचे चेअरमन गणेश वाजगे, किरण चौधरी, मंगेश नलावडे, स्वप्निल डेरे, सागर दरंदळे, राजेंद्र नाईकवाडी, अजित वाजगे,
शुभांगी पाटे, दिपाली खैरे, वैजयंती कोर्हाळे, स्नेहा डेरे, सारिका कोर्हाळे, अनिकेत कोर्हाळे, बाबू विटे, आशिष वाजगे, जुबेर आतार, गौतम औटी,गौरव पाटे, ऋषी वाजगे, प्रवीण पाटे, विलास पानसरे, कैलास पानसरे, सोपान खैरे, माऊली रासने, निलेश मेहता, शेखर शेटे, नितीन शेटे, बबन खैरे, शंकर जाधव, योगेश पानसरे, बाळा शिवले, अजित दरंदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार बेनके यांनी खोडद चौकातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम मंजूर केल्यामुळे व्यापार्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. खोडद रस्त्याच्या रुंदीकरणामुळे वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनमानसात बेनके यांनी केलेल्या विकासकामांचे कौतुक होत आहे.
जनता माझ्या पाठीशी – बेनके
आमदार बेनके यांच्या माध्यमातून महिलांसाठी लाडकी बहीण योजना, शेतकर्यांच्या वीजपंपाची बिल माफी, मोफत तीन सिलेंडर, लाडक्या भावांना व्यवसाय उद्योग प्रशिक्षण आणि भत्ता, मुलींसाठी मोफत शिक्षण अशा प्रकारच्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत असल्याने मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जुन्नर तालुक्याच्या विकासाची भूमिका माझ्या मनात असल्याने तालुक्यातील जनता माझ्या पाठीशी उभी राहील असा दृढ विश्वास महायुतीचे उमेदवार आमदार बेनके यांनी बोलून दाखवला