संभाजीराव झेंडे : गराडे येथे जनसंवाद दौर्यानिमित्त सभा
गराडे – पुरंदर तालुक्यामध्ये गुंजवणीच्या पाण्याचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत असतो. याच पाण्याच्या प्रश्नावर माजी जलसंपदा राज्यमंत्र्यांनी दोन निवडणुका लढवल्या व निवडून आले; परंतु अद्यापपर्यंत गुंजवणीचे पाणी पुरंदरमध्ये पोहोचलेच नाही. जनतेने त्यांना 2019 मध्ये घरी बसवले त्यांनी या निवडणुकीमध्ये घरी बसणे आवश्यक होते. असे पुरंदर हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी सांगितले.
गराडे (ता पुरंदर) येथे जनसंवाद दौर्या निमित्त आयोजित सभेत झेंडे बोलत होते. यावेळी हिवरे, चांबळी, भिवरी, बोपगाव, अस्करवाडी, पठारवाडी, गराडे, सोमर्डी, कोडीत बुद्रुक, कोडीत खुर्द, नारायणपूर, भिवडी, केतकावळे, कुंभोशी, या गावांचा दौरा आयोजित केला होता. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, दत्ता झुरंगे, विराज काकडे, संदीप जगदाळे,
राजेश चव्हाण, उत्तम धुमाळ, अनिल वाडकर, मोहन घारे, शामकांत भिंताडे, एम. के. गायकवाड, अॅड. तानाजी घारे, सागर काळे, वंदना जगताप, माजी नगरसेविका नीलम यादव, बापूसाहेब घारे, सुधीर झेडे, गणपत जगदाळे, रमेश घारे, बापुसाहेब घारे, शांताराम जगदाळे, रमेश घारे, आब्बास मुलाणी, अशोक जगदाळे, रवींद्र खैरे, रामदास जगदाळे, चंद्रकांत रावडे, यशवंत रावडे, प्रकाश फडतरे, भैय्यासाहेब खैरे उपस्थित होते.
झेंडे म्हणाले, पुरंदर तालुक्यामध्ये माजी मंत्र्यांनी खोटे बोलण्याचा सपाटा लावत आहे. विमानतळ आंतरराष्ट्रीय बाजार यासारखे वल्गना करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. 2019 प्रमाणे त्यांना जनतेने घरी बसवले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
पुरंदर तालुका हा भौगोलिक दृष्ट्या निसर्गरम्य आहे. नारायणपूर, केतकावळे, बालाजी, भुलेश्वर, जेजुरीचा खंडेराया, कानिफनाथ, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्मस्थळ, राजे उमाजी नाईक यांचे जन्मस्थान यासारखे अनेक वास्तू या तालुक्यांमध्ये आहेत. या वास्तूंचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्याचा आमचा प्रयत्न असून पर्यटन वाढवण्यावर आम्ही भर देणार आहोत. यामुळे तालुक्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतील व या निमित्ताने नागरिकांना व युवकांना रोजगार उपलब्ध होतील.
– प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, जिल्हा बँक