मंचर : अयोध्या येथील श्री राम मंदिर प्रथम वर्धापन दिनानिमित्त मंचर (ता.आंबेगाव) येथील राणा प्रताप प्रतिष्ठान यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे रविवार, दि. १९ रोजी आयोजन करण्यात आले.
रक्तदान शिबिराचे सकाळी सात ते सायंकाळी सातच्यादरम्यान नगरपंचायतीचे पटांगण या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास एक आकर्षक भेटवस्तू व वर्षभरात गरज लागल्यास दोन रक्त पिशवी मोफत मिळणार आहे.
तसेच प्रत्येक रक्तदात्यास रक्तदान केल्यानंतर त्याचा रक्तगट कोणता आहे. हे कळविण्यात येणार आहे. तरी या नियोजित कार्यक्रमासाठी उपस्थित राहून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन राणा प्रताप प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.