वाघोली (प्रतिनिधी) : पुणे जिल्हा भाजपच्या सर्व शाखा तसेच कार्यकारणीच्या वतीने पूरग्रस्त भागात जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीचा ओघ सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील यांनी दिली आहे.
याबाबत पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान ग्रस्त भागात पुणे जिल्हा भाजप कार्यकारणीच्या वतीने तातडीने शक्य तेवढी आर्थिक, साधनसामुग्री तसेच इतर प्रशासकीय मदत करण्यात येत असून यासाठी राज्य स्तरावरील तसेच जिल्हास्तरावरील कार्यकर्ते कार्यरत असून हा मदतीचा ओघ कायम ठेवण्यात येणार असल्याचे सातव पाटील यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने शक्य तेवढी मदत करण्यात येत असून भाजपच्या वतीने गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर शक्य तेवढी मदत साधन सामुग्री रोख रकमेसह जमा करून त्या त्या भागात पोचविण्यात येत आहे.
या कामी नागरिकांचे देखील सहभाग वाढू लागला आहे. पुणे जिल्हा भाजपच्या वतीने भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी तातडीने मदत करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील यांनी केले आहे.