सत्यशील शेरकरांची नारायणगावात सांगता सभा
नारायणगाव – भाजप सरकारच्या काळात शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने असे महत्त्वाचे निर्णय कोणतेही निर्णय घेण्यात आले नाही. या भाजप सरकारने उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले असल्याने या गद्दारांना घरी बसविण्यासाठी जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार (राष्ट्रवादी काँग्रेस) सत्यशील शेरकर यांना मताधिक्क्याने विधानसभेत पाठवा, असे आवाहन शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारार्थ नारायणगाव येथील सांगता सभेत खासदार डॉ. अमोल कोल्हे हे बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, शरद लेंडे, अनंतराव चौगुले, किशोर दांगट, शरद चौधरी, माऊली खंडागळे, तुषार थोरात, अशोक घोलप, प्रसन्न डोके, दिलीप बाम्हणे, मोहीत ढमाले, अंकुश आमले, दिलीप कोल्हे, योगेश पाटे, मंगेश काकडे, जयवंत घोडके, राजश्री बोरकर, समीर भगत, मोहन बांगर, कावा गागरे, संभाजी तांबे, भास्कर गाडगे, सुनील मेहेर, सईद पटेल, गुलामनबी शेख, सुमित्रा शेरकर, सुरेखा वेठेकर, सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ आदी मान्यवर, ग्रामस्थ मतदार उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले कि , खासदार अमोल कोल्हे यांचे कौतुक वाटतं , शेतकरी कुटुंबातील या मुलाला निवडून तुम्ही दिले आणि भारतीय जनता पक्षाला जो अहंकार होता तो घालवण्याचे काम येथील मतदारांनी केले. हे भ्रष्ट महायुतीचे सरकार आपल्याला घालवायचे आहे आणि महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे सरकार निवडून आणयाचे आहे.
– बाळासाहेब थोरात,माजी मंत्री
जुन्नर तालुक्यात शेती आणि शेतीपुरक व्यवसायांसाठी शासनाकडून भरीव निधी आणणार तसेच आयटी संबंधित रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी, हिंजवडी आणि मगरपट्टा या आयटी पार्कच्या धर्तीवर खासगी आणि सरकारी गुंतवणूक आणून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार. शेतीमाल परदेशी पाठविण्यासाठी आणे पठारावर कार्गो हब उभारुन तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणार असल्याचे सांगितले.आदीवासी भागातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी जलसाठे, धरणे आणि सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे
– सत्यशील शेरकर, उमेदवार, महाविकास आघाडी