पुणे जिल्हा : नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी भाजप आपल्या दारी

हवेली तालुका उपाध्यक्ष प्रदीप सातव यांची माहिती
वाघोली (प्रतिनिधी) –
करोना काळात वाढीव वीज बिलाबाबत पुणे जिल्हा  भाजपच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात आले आहे. वाढीव वीज बिलाबाबत तसेच महावितरण कडील इतर तक्रारीबाबत निराकरण करण्यासाठी हवेली तालुका भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने भाजप आपल्या दारी असा उपक्रम राबवून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणारा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपचे हवेली तालुका उपाध्यक्ष प्रदीप सातव पाटील यांनी दिली. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, शिरूर हवेली चे माजी आमदार बाबूराव पाचर्णे, तालुका भाजपचे अध्यक्ष सुनील कांचन यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणबाबत नागरिकांना येणाऱ्या तक्रारी हवेली तालुका भाजपच्या वतीने फोनद्वारे, भेटून, तसेच वेळप्रसंगी महावितरण कार्यालयात जाऊन सोडवन्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्यात येणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी अडचणी बाबत संपर्क साधावा, असे हवेली तालुका भाजपचे उपाध्यक्ष प्रदीप सातव पाटील यांनी सांगितले. महावितरणच्या विरोधात नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी हवेली तालुका भाजपच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.