पुणे – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारपासून सुरुवात झाली. त्यानुसार पहिल्याच दिवशी 27 उमेदवारांनी अर्ज नेले, तर चार उमेदवारांनी अर्ज भरले आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 6 डिसेंबरपर्यंत आहे.
कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत सहकार विभागातले अधिकारी व्यस्त असल्याचे कारण देत बॅंकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. यानंतर मार्चमध्ये आलेले करोनाचे संकट यामुळे या निवडणुका आणखी लांबणीवर गेल्या. त्यामुळे सध्याच्या संचालक मंडळाला वाढीव दीड वर्षांची संधी मिळाली आहे. निवडणुकीत 8 मतदारसंघांतून 21 संचालक निवडले जाणार आहे. यासाठी विविध गटांतून एकूण मतदारांची संख्या 5 हजार 166 इतकी आहे.
जिल्हा बॅंकेच्या मुख्य शाखेत निवडणूक कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. याच ठिकाणी उमेदवारी स्वीकारले जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी 27 उमेदवारांनी 133 अर्ज नेले आहे.
मतदारसंघ एकूण मतदार निवडले जाणारे संचालक
अ 1,294 13
ब 90 1
क 838 1
ड 2,944 1