पुणे- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) २१ संचालक पदासाठी आतापर्यंत १५ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दि. ६ डिसेंबरपर्यंत मुदत असल्याने पुढील दोन दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दा होण्याची शक्यता आहे.
राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बैंक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा नावलौकिक आहे. यावर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी कॉसची सत्ता असून बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आठ मतदारसंघातून २१ संचालक निवडले जाणार आहे. या निवडणुकीसाठी विविध मटांतून एकूण मतदारांची संख्या ५ हजार २६६ इतकी आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन दोन दिवस झाले आहेत. या दोन दिवसांत ३१६ उमेदवारी अर्ज नेण्यात आले आहेत, तर १५ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. दरम्यान, या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आहे.
यांनी भरले अर्ज
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप मोहिते, संजय जगताप, रमेश थोरात, अंकुश काकडे, संजय काळे, ना येळे, राजेंद्र कांचन, निवृत्ती गवारी, ज्ञानोवा दाभाडे, स्नेहलता कांचन, तुळशीराम मोईर, रेवणनाथ दारवटकर, सतीश काकडे