शिक्रापूर, वाडा, कासारीत कामांचे भूमिपूजन
शिक्रापूर (वार्ताहर) – विकास कामे करत असताना विकास कामांचा दर्जा चांगला असल्यास विकास कामे जास्त काळ टिकतात. म्हणून विकास कामांच्या दर्जाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले.
शिक्रापूर येथील राऊतवाडी येथे जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, पंचायत समिती सदस्या जयमाला जकाते यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषद शाळांच्या तीन वर्ग खोल्यांचे, वाडा पुनर्वसन येथे वाडागाव ते डिंग्रजवाडी फाटा तसेच कासारी येथे कासारी ते सोनारमळा रस्ता दुरुस्ती या विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कुसूम मांढरे, पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, जयमाला जकाते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रविबापू काळे, माजी सरपंच आबासाहेब करंजे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अरूण करंजे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे, बाबासाहेब सासवडे, जिजामाता बॅंकेचे संचालक पंडित दरेकर, शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक संभाजी भुजबळ, निळूभाऊ टेमगिरे, ग्रामपंचायत सदस्य गौरव करंजे, ग्रामविकास अधिकारी बि. बि. गोरे यांसह आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.