रस्त्याच्या वादातून घटना
बारामती – बारामती तालुक्यातील झारगडवाडीत एकाने पत्रकारासह त्यांच्या वयोवृद्द असलेल्या आई वडीलावर चाकूने खुनी हल्ला केला. झारगडवाडीत पत्रकार नवनाथ बोरकर त्यांची आई इंदुबाई धनाजी बोरकर आणि वडील धनाजी माधव बोरकर हे साठ वर्षांपासून राहत आहेत. त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचा अनेक वर्षांपासून वाद आहे.
याबाबत धनाजी माधव बोरकर यांनी आणि त्यांच्या मुलाने बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडे घराकडे येणारा रस्ता अडवल्याबाबत अपील केले होते. या संदर्भात बारामतीचे तहसीलदार यांनी दि. 1 जुलै रोजी धनाजी बोरकर आणि त्याच्या सहकार्यांच्या बाजूने रस्ता खुला करण्याचा आदेश पारित केला आहे.
याबाबत तहसीलदार यांनी पोलीस बंदोबस्त देण्याचे पत्र पुण्याचे पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. रस्त्याबाबत (दि.६) जून रोजी धनाजी बोरकर यांनी कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याबाबत तालुका पोलीस यांनी रस्ता अडवणाऱ्यांना रस्त्याचा तहसीलदार यांनी रस्ता खुला करण्याचा आदेश दिला आहे. रस्ता अडवू नका, अशी ताकीद दिली होती.
तरी सोमवार (दि.१) सकाळी आमच्या विरोधात पोलिसांत तक्रार करता काय, आता तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत अमर बोरकर, रामभाऊ बोरकर यांनी चाकूने हल्ला केला. मंजाबापू बोरकर, विक्रम बोरकर, अनिकेत बोरकर यांनी खोरे आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. यात पत्रकार बोरकर यांचे वयोवृद्ध वडील धनाजी बोरकर आणि आई इंदुबाई बोरकर हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.