पेरणे फाटा येथे स्वागत : महिलांकडून औक्षण
पेरणे – शिरूर- हवेली विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक पवार यांच्या निवडणूक प्रचारार्थ तुळापूर, फुलगाव, वढु खुर्द, पेरणे,डोंगरगाव, बुर्केगाव, पिंपरी सांडस, न्हावी सांडस, सांगवी सांडस, शिंदेवाडी, हिंगणगाव, आष्टापूर येथे गावभेट दौरा आयोजित केला होता.
पेरणे येथे अशोक पवार यांनी गावकरी, मतदारांची भेट घेतली. यावेळी अशोक पवार यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी पेरणे येथील पेरणे फाटा, तापकीर वस्ती परिसरामध्ये आमदार अशोक पवार यांची बैलगाडीमधून जंगी मिरवणूक काढून जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी जागोजागी महिलांकडून आमदार अशोक पवार यांना ओवाळण्यात आले, यावेळी मोठ्या संख्येने नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.