टाकळी हाजी – पुणे जिल्ह्यातील अग्रमानांकित, शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी शर्मिला अर्जुन निचित यांची बिनविरोध निवड झाली. मानद सचिवपदी विजय गोडसे आणि खजिनदारपदी अंजली संपत शिंदे यांची निवड झाली. निवडीनंतर सहकार पॅनलतर्फे नवनिर्वाचित पदाधिकारी यांना सन्मानित करण्यात आले. चारशे कोटी उलाढाल असलेल्या पतसंस्थेचे सभापतीपद मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.
सभापती काळात सर्वांना सोबत घेऊन सभासद हिताची कामे करून पतसंस्थेच्या गौरवात आणखी भर घालणार असल्याचे निचीत यांनी सांगितले. नूतन मानद सचिव विजय गोडसे यांनी संस्थेच्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा मांडला. पतसंस्थेवरील विश्वासामुळे सभासदांनी ११६ कोटी ठेवी आजपर्यंत ठेवल्या असून पुढील काळात ठेवी वाढवून पतसंस्था स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पदवीधरचे राज्याध्यक्ष अनिल पलांडे व अखिल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल महाजन यांनी संस्थेत चांगला कारभार करुन पतसंस्था विकासासाठी कार्यरत रहा, असे नूतन पदाधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी अखिल भारतीय शिक्षक संघाच्या राष्ट्रीय महासभेच्या सदस्य साधना खोमणे, अखिल शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष अशोक पठारे, माजी अध्यक्ष अर्जुन निचित, विजय थिटे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपसभापती संतोष विधाटे, माजी चेअरमन म्हातारबा बारहाते, नंदकिशोर पडवळ, चंद्रकांत खैरे, संचालक रामचंद्र नवले, संदीप थोरात, मानसी थोरात, संपत शिंदे, तज्ज्ञ संचालक चंद्रकांत दंडवते, कार्यकारी संचालक सुनील भुजबळ, बाळासाहेब निर्वळ, संपत शिंदे ,
जिल्हा सरचिटणीस सुरेश थोरात, श्रीकांत निचित, तालुका सरचिटणीस गणेश पवार, धनंजय जाधव, माजी चेअरमन दिवाण विधाटे, सुभाष थोरात, संपत शिंदे, पांडुरंग निचित, संजय थोरात, नवनाथ निचित, लक्ष्मण जगताप, सरला फुंदे, स्वातीताई दंडवते, प्राजक्ता मुळे, शितल शेळके, संजना थोरात, सुमन पठारे, शितल थोरात ,राष्ट्रपती पुरस्कार विजेते रंगनाथ नीचित, विमल निचीत, सहकार पॅनलचे सभासद उपस्थित होते. तालुकाध्यक्ष कल्याण कोकाटे यांनी नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन रामचंद्र नवले यांनी केले. बिभीषण गांजे यांनी आभार मानले.