पुणे जिल्हा: जातेगाव खुर्दमधील दुसरा बिबट्या जेरबंद

शिक्रापूर – जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथे अनेक दिवसांपासून नागरिकांना दोन बिबट्यांचे दर्शन होत होते. दि. 12 सप्टेंबर रोजी एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये अडकला आहे. तर दुसऱ्या बिबट्यालादेखील जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. या बिबट्याला जुन्नर येथील बिबट निवारण केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे.

जातेगाव खुर्द येथील नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होऊन या भागामध्ये एकाच वेळी दोन बिबटे दिसून येत असल्याने नागरिकांच्या मागणीनुसार शिरूर वनविभागाच्या वतीने जातेगाव खुर्द येथील तांबे वस्ती येथे ग्रामपंचायत सदस्य महेश मासळकर यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आलेला होता, 12 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला होता.

यावेळी शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे, वन्य पशू पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भाडळे, सर्पमित्र शेरखान शेख, सर्पमित्र अमोल कुसाळकर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस नाईक संतोष शिंदे, प्रताप कांबळे यांनी सदर ठिकाणी धाव घेत नागरिक व ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला शिरुर वनपरिक्षेत्र कार्यलय येथे दाखल केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.