पुणे जिल्हा: “कडूस’कडून सव्वातीन कोटींचे कर्ज वाटप

रब्बी हंगामासाठी सभासद शेतकऱ्यांना अर्थसहाय्य

Madhuvan

राजगुरूनगर – कडूस (ता. खेड) विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभासद शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील 432.50 क्षेत्राला 3 कोटी 15 लाख 67 हजार 500 रुपयांचे पीक कर्जाचे पहिले वाटप करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पंडित मोढवे यांनी दिली.

कडूस विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने या वर्षी 75 वर्षे पूर्ण केली आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक तथा आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य अशोक शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीच्या सभासदांना रब्बी हंगामासाठी पीक कर्ज संस्थेचे अध्यक्ष पंडित मोढवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य अशोक शेंडे, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत पारधी, संचालक दामोधर बंदावणे, निवृत्ती नेहेरे, अशोक गारगोटे, बाजीराव शिंदे, सुदाम ढमाले, साईनाथ गारगोटे, ज्ञानेश्‍वर ढमाले, गोविंद वारे, विमल कालेकर, संगीता अरगडे, सुधीर जाधव, लक्ष्मण मुसळे, सचिव तात्यासाहेब कल्हाटकर आदींसह सभासद शेतकरी सेवक उपस्थित होते.

करोनाच्याबरोबरच अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना सोसायटीच्या वतीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे मोढवे यांनी नमूद केले

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.