आळंदी : राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी आळंदी हे प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. सद्यस्थितीत आळंदीत रस्ते विकास व विविध ठिकाणी सुशोभीकरणाची विकास कामे पूर्ण होत असली तरी पाण्याची समस्या अजून ही सुटली नाही. गावात नदी असून ती जल प्रदूषणामुळे उपयोगी पडत नाही. व गावात दिवसेंदिवस पाण्याच्या समस्येत अजून वाढच होताना दिसून येत आहे.
आळंदी शहरामध्ये पाणीपुरवठा होत असताना खेड विभागात विभाग टप्प्या नुसार दोन दिवस तर हवेली विभागात एक दिवस असा सद्यस्थितीत पाणीपुरवठा होत असून म्हणजेच तिसर्या दिवशी आळंदीकरांना (पाणीपुरवठ्याची मर्यादा वेळ) दीड तास पाणीपुरवठा होत आहे.त्यात ही समस्या उद्भवल्यास चौथ्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या अवेळीत होणार्या पाणीपुरवठ्या बाबत वेळोवेळी म्हणेणे मांडले जाते. शहरात पाणी पुरवठ्याचे टप्पे ठरले असून त्या टप्प्यात त्या भागास दीड तास पाणीपुरवठा गेला जातो. पाइपलाइन फुटणे, मुख्य केंद्रावरील दुरुस्ती अशा समस्या उद्भवल्यास शहरात पाणी पुरवठा अजून उशिराने होत असतो.
डिसेंबर 2019 मध्ये तत्कालीन मुख्याधिकारी समीर भूमकर व पाणीपुरवठा अधिकारी अक्षय शिरगिरे यांच्या कालावधीत आळंदी शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला.त्यावेळेस काही लोकप्रतिनधीं सुद्धा या दिवसाआड पाणीपुरवठाला संमती दर्शवली होती. इंद्रायणी नदीचे होणारे वारंवार जलप्रदूषण व त्या जल प्रदूषणामुळे उद्भवणार्या समस्या यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला गेला त्यास पूर्ण 5 वर्षे होऊन गेले आहे.
भामा आसखेड धरणाचे आळंदी शहरात पाणी
भामा आसखेड धरणातील पाणी कुरुळी जॅकवेलमधून 14 फेब्रुवारी 2022 रोजी आळंदी शहरात प्राथमिक सराव चाचणीद्वारे पाणी दाखल झाले. इंद्रायणी नदीचे प्रदूषित पाणी शहरात पाणी मिळणार नाही म्हणून नागरिक आनंदित होते; परंतु कुरुळी येथून आळंदी शहराकडे पाणीपुरवठा करणार्या पाइपलाइन फुटण्याचे प्रकार गळती, वॉल्व्ह दुरुस्ती, वीज समस्या यामुळे आळंदी शहरातील दिवसाआड पाणीपुरवठावर ही परिणाम दिसून येत आहे. तसेच मध्यंतरी आळंदी शहरातील नवीन पाणीपुरवठा करणार्या पाइपलाइनमध्ये विविध विभागातील ठिकठिकाणी काही दोष आढळल्याने तेथील नागरिकांना पाणीपुरवठा कमी प्रमाणात तर काही ठिकाणी होत नसल्याचे आढळून येत होते.
तो पाणीपुरवठा पूर्णपणे होते का?
सद्यस्थितीत इंद्रायणी नगर रस्त्यावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे कार्य चालू होते त्यामध्ये वारंवार आळंदी शहरास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने आळंदी शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झालेला दिसून येत होता. भामा आसखेड योजनेतील कुरुळी येथून आळंदी शहरास जवळपास 10 एमएलडीचा पाणीपुरवठा होत आहे. तो पाणीपुरवठा कुरुळी येथून पूर्णपणे होत आहे का, असा सवाल ही होत आहेत.
दोन दिवसाआड पाणी पुरवठा
शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत होता त्यात आता या काही गेल्या महिन्यांपासून आळंदीकरांस तिसर्या दिवशी (पूर्ण दोन दिवस होऊन त्यानंतर) पाणीपुरवठा होत आहे. तर अडचणी आल्यास चौथ्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. दिवसाआड होणार्या पाणी पुरवठ्याच्या या वेळेत बदल झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहे. दोन दिवसानंतर तिसर्या दिवशी शहरात नागरिकांना दीड तासच पाणी भेटत असल्याने पाण्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
फोटो : संग्रहित आहे..