बेल्हे – जाधववाडी (ता. जुन्नर) या ठिकाणी उपोषणास बसलेले राजेंद्र पायमोडे यांनी प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर उपोषण सोडले.
याबाबत माहिती अशी, जाधववाडी (ता. जुन्नर) येथील राजेंद्र पायमोडे हे विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसलेले होते.
आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, महसूल विभागाच्या शीतल गर्जे, सरपंच अजित जाधव यांच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण सोडण्यात आले आहे. जाधववाडी परिसरातील ऊस तोडण्यासाठी जे मजूर येतात ते उघड्यावर शौचास बसतात.
गावामधील जी रस्त्यांची कामे चालु आहे त्याची प्लॅन इस्टीमेंट द्यावे व गावात असलेल्या ओढ्यावर जे अतिक्रमण झालेले आहे ते काढावे या मागण्यांसाठी पायमोडे हे उपोषणास बसले होते.
जाधववाडी येथील पायमोडे हे ज्या मागण्यांसाठी उपोषणास बसलेले होते, त्यांनी ते सोडलेले आहे. गावातील ओढ्यावर अतिक्रमण झालेले असेल त्याची महसूल विभागाच्या वतीने मोजणी करण्यात येईल.
-शीतल गर्जे, महसूल विभाग
गावात ऊस तोडण्यासाठी बाहेरून जे मजूर येतात त्यांच्यासाठी ग्रामसभेत ठराव करून पुढील वर्षी शौचालयाची व्यवस्था करण्यात येईल. तसेच कामांची चालू असलेली माहितीची कागदपत्रे मागवली असून ती उपलब्ध झाल्यावर मिळून जातील.
-अजित जाधव, सरपंच जाधववाडी