पुणे जिल्हा: पारंपरिक पद्धतीने आदिशक्तीचा जागर सुरू

खंडोबाचा गाभारा पाना-फुलांनी सजविला ः नवरात्र उत्सवास प्रारंभ

Madhuvan

जेजुरी – अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत तथा बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर शासनाचे नियम, अटी व सूचनांचे पालन करून शनिवारी (दि. 17) विधिवत घटस्थापना करण्यात येऊन नवरात्रउत्सवास प्रारंभ करण्यात आला. नवरात्रोत्सवानिमित्त जेजुरी गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मुख्य मंदिर गाभारा पानाफुलांनी सजविण्यात आला आहे.

तत्पुर्वी मुख्य मंदिर गाभाऱ्यात विधिवत पाकाळणी धार्मिक विधी करण्यात येऊन उत्सव मूर्तींसह मार्तंड भैरवमूर्तींना नवीन पोशाख परिधान करण्यात आले, यानंतर घडशी समाज बांधवांच्या सनईचौघड्याच्या मंगलमय वाद्यांत पुजारी, सेवेकरी मानकरी यांनी उत्सवमूर्ती बालद्वारी येथे आणल्या व विधिवत धार्मिक विधी करत घटस्थापना करण्यात आली.

या धार्मिक विधीपूर्वी शासनाने घालून दिलेल्या नियम अटी सूचनांचे पालन करीत सुरक्षिततेचा भाग म्हणून सोशल डिस्टन्सिंगसह सॅनिटायझर ठेवण्यात आले होते. या विधीला मोजक्‍याच पुजारी, ग्रामस्थ, मानकरी यांची उपस्थिती होती.

यावेळी अक्षय नितीन बारभाई, अध्यक्ष गणेश आगलावे, प्रशांत सातभाई, ओम पुजारी, संतोष उपाध्ये, बापू सातभाई, रत्नाकर मोरे, दत्ता मोरे, काशिनाथ मोरे, राजू मोरे, हनुमंत लांघी, जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे, सोमनाथ उबाळे, मुख्य विश्‍वस्त संदीप जगताप, विश्‍वस्त पंकज निकुडे, प्रसाद शिंदे, अशोक संकपाळ, शिवराज झगडे, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते. विधींचे पौरोहित्य वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी यांनी केले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.