मंचर : वद्यार्थ्यांनी वाहन चालवताना हेल्मेट व वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. 18 वर्षाच्या आतील मुला-मुलींनी वाहन परवाना नसताना वाहन चालू नये. वाहन चालवताना योग्य दक्षता व वेगावर नियंत्रण ठेवले तर अपघात टाळता येतील. असे आवाहन पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या इन्स्पेक्टर कोमल गाडेकर यांनी केले.
प्रादेशिक परिवहन विभाग पिंपरी चिंचवड व अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत व्याख्यान वेगावर नियंत्रण हेच कुटुंबाचे रक्षण या विषयावर विद्यार्थ्यांसाठी रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत व्याख्यान मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात आयोजित केले होते. यावेळी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या इन्स्पेक्टर कोमल गाडेकर व इन्स्पेक्टर किरण चौधरी उपस्थित होते.
यावेळी किरण चौधरी यांनी रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना शपथ दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना वाहन चालवताना घ्यावयाची काळजी व हेल्मेट चा वापर कसा किती फायद्याचा हे पटवून दिले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ज्यूनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. प्रकाश कणसे तर सूत्रसंचालन प्रा. कैलास एरंडे यांनी केले. तर प्रा. अविनाश झावरे यांनी आभार मानले.