पुणे जिल्हा ; जेजुरी-मोरगावच्या मार्गावर भीषण अपघात ; एकाच जागीच मृत्यू ;दोघे गंभीर जखमी

मोरगाव : जेजुरी-मोरगावच्या मार्गावर आंबी पाटी येथे दोन वाहनांचा भीषण अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात एका वयोवृद्धांच्या जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघेजण यात गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत सविस्तरवृत्त माहीती अशी की, काल सायं ७ वाजण्याच्या दरम्यान जेजुरीवरुन बारामती येथे जाणारी महिंद्रा पिकअप गाडी (एम एच ४२ एक्यु ६१३७ ) आंबी पाटी येथे आली असता पिकअप चालक तानाजी त्रिंबक आटोळे याचा वाहनावरील ताबा सुटला. याच दरम्यान सोमेश्वर कारखान्याकडे उसाने भरलेला ट्रक्टर जात असताना दोन्ही वाहनाची जबर धडक झाली. घटनेची माहीती समजताच मोरगाव पोलीस चौकीचे पोलीस हवलदार एस.ए. मोहीते, पोलीस पाटील नयना नेवसे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सायंकाळी झालेल्या भिषण अपघातात इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील सुभाष विठोबा शिंदे (७०) हे जागीत म्रूत्यू पावले आहेत. तर नारायण मिसाळ, सचीन रामभाऊ पवार यांच्या हाताला व पायाला मार लागला आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बारामती येथील शासकीय रुग्णालयात हलवले असून दोघांची प्रकृती स्थिर आहे .

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.