ओतूर :ओतूर ता. जुन्नर येथील वाघदरातील कुडाचे माळ परीसरात सोमवारी पहाटे बिबट्याने मेंढपाळाच्या वाड्यावरील पालात घुसून महिलेवर हल्ला करून तीला जखमी केले.
यावेळी या मेंढपाळाच्या पाला मध्ये सदर महिलेची दोन मुले व सुन आणि आठ महिन्याचा नातू ही पालात झोपले होते. सुदैवाने मोठी दुर्घटनाच टळली असल्याची भावना स्थानिक नागरीक व्यक्त करत असून मेंढपाळाच्या कुत्र्यानी गोंगाट केल्याने बिबट्या पळून लावले आहे.
मिराबाई बरू बरकडे वय. ४४ असे बिबट हल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव असून सोमवारी पहाटे चार वाजे दरम्यान बिबट्याने हल्ला केला. बिबट हल्या नंतर जखमी महिलेला ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचरासाठी पहाटे अणले असता येथील डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी तिच्यावर उपचार करून वनविभागाला सदर घटनेची माहीती दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचार्याच्या पथकाने सदर महिलेला पुढिल उपचारासाठी नारायणगाव येथे नेले.
या बिबट हल्ल्याबाबत स्थानिक नागरीकांकडून मिळालेली माहिती अशी की सदर मेंढपाळांने ओतूर मधील वाघदरा येथील कुडाचे माळ येथे आबांदास डुंबरे यांच्या शेतात रात्रीचा मुक्कामी मेंढ्याचा वाडा ठेवला होता. एकूण १५० मेंढ्याच्या वाड्यात पाल ठोकूण मेंढपाळ कुटूंब झोपले होते. सोमवारी पहाटे चार वाजेदरम्यान बिबट्याने पालात झोपलेल्या मिराबाई बरकडे यांच्यावर हल्ला करून उजव्या हाताला चावा घेऊन ओढण्याचा प्रयत्न केला.
मात्र मेंढ्या बरोबर असलेल्या कुत्र्यानी मोठ्या आक्रमक पणे भुकून बिबट्याला पळवून लावले. कुत्र्याच्या गोगाटामुळे मिराबाई यांचे दोन्ही मुले अमोल बरकडे व राहूल बरकडे आणि सुन व आठ महिन्याचा नातू सर्व जागे झाले. मुलानी अभिषेक गाढवे यांना फोन करून बिबट्या हल्ला केल्याची माहिती दिल्यावर अभिषेक त्याना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
सदर परीसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी संतोष डुंबरे, अभिषेक गाढवे, नारायण डुंबरे, दिपक डुंबरे, भरत डुंबरे, हरिभऊ डुंबरे, मिलिंद डुंबरे, संतोष खंडागळे, महादू खंडागळे, तुळशीराम खंडागळे यांनी केली आहे.