शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) येथे महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
बंटी संजय सोंडे (रा. सोंडेआळी, शिक्रापूर), असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. एका महिलेचे पती कामाला चाललेले असताना बंटी सोंडे याने महिलेच्या घरासमोर महिलेच्या पतीला कार समोर कार आडवी लावून ठेवली. त्यावेळी महिलेचे पती हॉर्न वाजवत असताना सुद्धा बंटी याने कार बाजूला घेतली नसल्याने महिलेने त्याला कार बाजूला घेण्यास सांगितले.
त्यांनतर बंटी कार घेऊन निघून गेला. त्यांनतर पुन्हा महिलेच्या घरासमोर येत महिलेला शिवीगाळ करीत दमदाटी केली. याबाबत महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी सोंडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार विश्वांबर वाघमारे हे करीत आहेत.