पुणे जिल्हा । शिक्रापुरातील बोगस डॉक्‍टरला करोनाची लागण

शिक्रापूर  -येथील एका हॉस्पिटलमध्ये बोगस डॉक्‍टरच्या सहाय्याने कोविड सेंटर चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने कारवाई करत बोगस डॉक्‍टरला अटक करत चौघांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र यातील अटक करण्यात आलेल्या व गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेल्या बोगस डॉक्‍टरला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

शिक्रापूर येथील बजरंगवाडी परिसरात आधार हॉस्पिटल नावाने हॉस्पिटल सुरू असून त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे कोविड सेंटर चालविले जात होते. हॉस्पिटल चालविणारा बनावट डॉ. रामेश्‍वर बंडगर याच्यासह डॉ. निखिल इंगळे, डॉ. विजय डोईफोडे, डॉ. घाटे यांच्यावर गुन्हे दाखल करत रामेश्‍वर विठ्ठलराव बंडगर (वय 28, सध्या रा. ज्ञानमंजुळा सोसायटी तळेगाव ढमढेरे रोड शिक्रापूर ता. शिरूर) यास अटक केली होती.

त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते, मात्र त्यानंतर त्याची रवानगी येरवडा येथील न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले असताना पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची कोविड तपासणी केली असता तो बनावट डॉक्‍टरच करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.