रेडा -इंदापूर पोलिसांनी शनिवारी (दि. 21) रात्री साडेआठच्या सुमारास येथील कुरेशी गल्लीत छापा टाकला. यावेळी कत्तलीसाठी आणलेल्या जर्सी गायीची 63 वासरे व एका रेडकाची सुटका केली. याप्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.
अजिम मुनीर कुरेशी, जमीर कुरेशी, रशीद बेपारी, समीर कुरेशी, शाहीद कुरेशी (सर्व रा. कुरेशी गल्ली इंदापूर) बंडु दगडु जाधव (वय, 39 रा. रामोशी गल्ली, इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. यातील अजिम कुरेशी, बंडु जाधव या दोघांना अटक करण्यात आली आहे. हवालदार शंकर वाघमारे यांनी याबाबत इंदापूर पोलिसांत फिर्याद दिली.
इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, सहायक पोलीस निरीक्षक अजित जाधव, भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, फौजदार दाजी देठे, हवालदार वाघ, पोलीस शिपाई जमादार, काकासाहेब पाटोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अजित जाधव करीत आहेत.
यावेळी तीन लाख रुपये किंमतीच्या पिकअपसह पन्नास किलो मांस, कातडी जप्त केले आहे. जर्शी गायीच्या वासरांना व रेडकास पुढील देखभालीसाठी बोरमलनाथ गोशाळा ट्रस्ट केडगाव चौफुला, यवत पुणे येथे दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरुन जप्त मांस हे नाशवंत व दुर्गंधीयुक्त असल्यामुळे पंचासमक्ष ते पुरुन नष्ट करण्यात आले.