इंदापूर : इंदापूरचे आमदार व राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील गोरगरिबांच्या पक्क्या घराचे स्वप्न पंतप्रधान घरकुल योजने अंतर्गत साकार केले आहे. या अंतर्गत इंदापूर तालुक्यात 5 हजार 281 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.
पुणे जिल्ह्याला दुसर्या टप्प्यात यावर्षी 38 हजार 827 घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट शासनाने दिले होते.
त्यापैकी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून 32 हजार118 विक्रमी घरकुलांना मंजुरी दिली आहे. यात इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक 4 हजार 608 घरकुलांचा समावेश आहे. या वर्षात पहिल्या टप्प्यात 1 हजार 88 घरकुल मंजूर आहेत, त्यापैकी 741 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केलेला आहे. तसेच पहिला व दुसरा टप्पा मिळून इंदापूर तालुक्यात 5 हजार 275 घरकुलांना आज अखेर मंजुरी मिळाली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2024-25 अंतर्गत इंदापूर तालुक्याला 5723 घरकुलांचे उद्दिष्ट आमदार भरणे यांच्या माध्यमातून मिळाले होते. त्यापैकी 5281 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.तर आधार कार्ड व तांत्रिक अडचणी संदर्भातील 442 घरकुलांना मंजुरी देणे अजूनही प्रलंबित आहे. त्यातील 741 लाभार्थ्यांना अनुदानाचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. तर 4540 लाभार्थ्यांना हप्ता वितरित करणे बाकी आहे. तसेच फेज दोनच्या पहिल्या टप्प्यात 1115 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
त्यापैकी 1088 घर मंजुरी देण्यात आलेले आहे. त्यापैकी 741 लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. तर दुसर्या टप्प्यात 4608 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आली होती. त्यापैकी 4193 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. तर आधार व तांत्रिक अडचणीची संबंधित 415 घरकुलांना मंजुरी देणे प्रलंबित आहे.