पुणे जिल्हा: शिरूरच्या 15 गावांत 40 करोनाबाधित

शिरूर  -शिरूर तालुक्‍यातील 15 गावांत 40 करोना बाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी दिली आहे. बाधितांचा एकूण आकडा 7124 एवढा झाला असून, 6672 जणांनी करोनावर मात केली आहे, तर 175 जणांचा मृत्यू झाला आहे.

77 जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तालुक्‍यात आज शिक्रापूर 8, शिरूर शहर 6, शिरूर ग्रामीण व तळेगाव ढमढेरे प्रत्येकी 5, सणसवाडी व मांडवगण फराटा प्रत्येकी 3, रांजणगाव गणपती 2, वडगाव रासाई, कारेगाव, आंबळे, कर्डिलवाडी, आंबळे, ढोक सांगवी, आलेगाव पागा, केंदूर, विठ्ठलवाडी यांगावात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांनी केले आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.