शिरूर : शिरूर तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक,अव्वल कारकून यांची तब्बल १३ पदे रिक्त असून मोजक्या कर्मचाऱ्यांकडून शिरूर तालुक्याचा गाडा हाकला जात आहे. शिरूर तालुका सर्वात मोठा तालुका असून तालुकाभरातून आलेल्या प्रकरणांचा निपटारा करणे रिक्त पदांमुळे अवघड बनले आहे. निलेश वाळुंज यांनी याबाबतची माहिती घेत रिक्त पदे भरण्यासाठी पुणे जिल्हाधिकारींना निवेदन दिले आहे.
जनहित लक्षात घेऊन लवकरात लवकर उचित कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांनी दिला आहे. शिरूर तहसील कार्यालयामध्ये महसूल सहाय्यक व अव्वल कारकून यांची अनेक पदे रिक्त असून एकीकडे काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे जनतेची होणारी ससेहोलपट तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याने व काही अधिकाऱ्यांवरती अतिरिक्त अनेक कार्यभार असल्याने सर्वसामान्य नागरिक शेतकऱ्यांना मात्र तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. यातून नागरीकांचे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक नुकसान होत आहे,
रिक्त जागांचा तपशील पुढीलप्रमाणे
१ )महसूल सहाय्यक यांची एकुण मंजूर पदे १७ असून कार्यरत पदे ७ आहेत, आणी रिक्त पदे तब्बल १० आहेत.
२ )अव्वल कारकुन यांची एकुण मंजूर पदे ०९ आहेत आणी कार्यरत पदे ०७ आहेत रिक्त पदे ०२ दोन आहेत.
३ )मंडल अधिकारी यांची एकुु मंजूर पदे १० आहेत आणी कार्यरत पदे ०९ आहेत रिक्त पद १ आहे.
सदर रिक्त पदे जनहितास्तव गांभीर्यपूर्वक दखल घेऊन त्वरित भरण्यात याव्यात. याप्रकरणी जनहित लक्षात घेऊन उचित कार्यवाही न झाल्यास आंदोलन,उपोषण करावे लागल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल असे निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार तथा ग्राहक पंचायत शिरूर तालुका अध्यक्ष अरुणकुमार मोटे, साहेबराव लोखंडे आदी उपस्थित होते, सदर निवेदन अधिक माहितीस्तव विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडेही पाठवण्यात आले आहे.