चिंबळी : निघोजे येथे 1 ते 15 वर्ष वयोगटातील 1107 विद्यार्थ्यांना जे. ई. (मेंदुज्वर)लसीकरण करण्यात आले.
निघोजे ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच सुनीता येळवंडे, उपसरपंच सागर येळवंडे, ग्रामपंचायत सदस्य दीपक कांबळे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. एक ते पंधरा वर्षे वयोगटातील जिल्हा परिषद शाळा,अंगणवाडी,गावठाण फडकेवस्ती,कुरणवस्ती, डोंगरवस्ती या ठिकाणी एकूण 1107 मुलांना लसीकरण केल्याची माहिती डॉ. स्मिता गाढवे यांनी दिली.
शांत सोनवणे आरोग्य सेवक यांनी उपस्थित लाभार्थी व पालकांना मेंदूज्वर आजार व लसीकरणाचे महत्त्व सांगितले. तसेच किटकजन्य आजार या विषयी आरोग्य शिक्षण दिले. या आजारापासून संरक्षण करण्याकरिता ही लस टोचून घेणे आवश्यक आहे. यात 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास माने वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मेंदूज्वर लसीकरण मोहिम सुरू आहे.
यावेळी उदयोजक कैलास येळवंडे, सोमनाथ येळवंडे, प्रशांत येळवंडे, डॉ.स्मिता गाढवे समुदाय आरोग्य अधिकारी, राजेश चांदणे, संतोष फडके, आरोग्य निरीक्षक सविता टेकवडे, विजया टेमगिरे, (आरोग्य सहायिका) मुख्याध्यापक कृष्णदेव काटकर, प्रशांत सोनवणे, हरिदास टेकवडे, स्वप्निल साखरे, सौरभ शिंदे, रेश्मा सोनवले, किशोरी जोशी, भारती राक्षे, प्रेमलता दुबे, रुपाली जाधव, आशालता सुर्वे, मयुरी लवांडे, मीना बेंडाले, परिचर वाहचालक बाळा शिवेकर, शाळेचे शिक्षक आदी कर्मचारी यांनी लसीकरण करण्यासाठी सहकार्य केले.