पुणे : ज्येष्ठ नागरिक संस्कृती, समाजाचा आधारस्तंभ आहेत. त्यांच्या आरोग्य, कल्याण आणि आनंदासाठी योगदान देणे महत्त्वाचे आहे, असे मत माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिक संघ प्रेमनगरच्या २१ व्या वर्धापन दिननिमित्त मातृ-पितृ प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श माता-पिता पुरस्कार २०२५ सुरेखा व अनंदराव रामचंद्र चव्हाण यांना जनसेवा फाउंडेशन अध्यक्ष विनोद शहा, पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमाळकर, प्रसिद्ध साहित्यिका माधवी वैद्य, उद्योगपती चंद्रशेखर दादासाहेब गुजर व संघाचे अध्यक्ष वि.वा. कुलकर्णी, माजी नगरसेविका मनीषा चोरबेले व मातृ-पितृ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांच्या हस्ते देण्यात आला.
या प्रसंगी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे प्रणव सुखदेव आणि रुपाली शिंदे या दोन साहित्यिकांचा सदाबहार जीवन साधना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कुसुमाग्रज कट्टा पुणेचे अध्यक्ष विजय जोग, मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना पुणेचे अध्यक्ष दिलीप पवार, संघाचे रणजीत अभ्यंकर, मुकुंद सांगलीकर,भारती पाटील, उषा पायगुडे,सुनीता देशपांडे, प्रकाश पोरवाल, नरेंद्र पवार,कविता वैरागे, राजश्री शिळिमकर,बाळासाहेब अटल उपस्थित होते. सूत्रसंचालन सुधीर चौधरी व पुरस्कारांचे सूत्रसंचालन अनिता चौधरी यांनी केले केले.