“दृकश्राव्य अध्ययन अधिक काळ टिकते’

चिंबळी- दृकश्राव्य माध्यमातून घेतलेली माहिती विद्यार्थ्यांच्या स्मरणात अधिक काळ टिकते. यासाठी फडकेवस्ती (निघोजे, ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यपनात उपयुक्‍त असे ई-लर्निग संच चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून निघोजे ग्रामपंचायतीकडून मिळाले असल्याची माहिती मुख्याध्यापक अरुण गायकवाड यांनी दिली.

या ई-लर्निग संचाचा शुभारंभ सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच रामदास येळवंडे, आशिष येळवंडे, सदस्या सुजाता फडके, सुनिता शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. शाळेसाठी अजून एक स्मार्ट एल. ए. डी. संच देणार असल्याचे उपसरपंच येळवंडे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याप्रसंगी शाळा समिती अध्यक्षा रुपाली फडके, उपाध्यक्ष राजेश येळवंडे, गजानन फडके, भानुदास येळवंडे, ग्रामविकास अधिकारी विष्णू गाडीलकर, सदस्य निलेश पवार, जितेंद्र आल्हाट, रुपाली येळवंडे, अलका पाडेकर, नम्रता येळवंडे आदी मान्यवर उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अरुण गायकवाड, तर सीता गेंगजे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)