पुणे – पोलीस महासंचालक जायस्वाल यांनी घेतला सुरक्षेचा आढावा

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल मंगळवारी पुणे शहराला भेट दिली. पुणे पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत जायस्वाल यांनी पुणे, बारामती आणि शिरुर मतदार संघातील मतदानाच्या दिवशी शहरात लावण्यात येणाऱ्या बंदोबस्त बाबतचा आढावा घेतला.

पुणे पोलिसांच्या अखत्यारित शिरुर आणि बारामती लोकसभा मतदार संघाचा काही भाग येतो. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान दि.23 एप्रिल रोजी होणार आहे तर शिरुर लोकसभा मतदार संघातील मतदान दि. 29 एप्रिल रोजी होणार आहे. बारामती मतदार संघातील काही भाग हडपसर, कोंढवा, कोथरूड, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येतो. शिरुर लोकसभा मतदार संघाचा काही भाग हडपसर पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येतो. लोकसभा मतदार संघाची रचना तसेच उपलब्ध मनुष्यबळाचा आढावा पोलीस महासंचालक जायस्वाल यांनी घेतला. याप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंक टेशम, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.