पुणे – अल्फा स्पोर्टस कंपनीची मालकी असलेला पुणे डेव्हिल्सचा संघ अबूधाबी टी-10 लीग क्रिकेट
स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. संघात सॅम बिलिंग्स, अजंथा मेंडीस, चामरा कपुगेदरा, थिसेरा परेरा व महंमद आमीर या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे, अशी माहिती संघाचे सहमालक क्रिशन कुमार चौधरी यांनी दिली.
ही स्पर्धा अबूधाबीतील शेख झायेद स्टेडियमवर येत्या 28 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष आहे. पुणे डेव्हिल्सच्या 14 खेळाडूंच्या संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
संघ – थिसेरा परेरा, महंमद आमीर, हार्डूस विजोन, सॅम बिलिंग्स, चामरा कपुगेदरा, अजंथा मेंडीस, डेव्हन थॉमस, दर्वेश रसूल, नासर हुसेन, केनर लेविस, आसीफ खान, महंमद बुटा, दीनेश कुमार, वृत्या अरविंद, के. सी. करन व मुनीस अन्सारी.