पुणे: ऑक्‍सिजनची मागणी तब्बल 63 टक्‍क्‍यांनी घटली

पुणे – करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्‍सिजनसाठी धावपळ करावी लागत होती. या काळात पुण्यात ऑक्‍सिजनची दैनंदिन मागणी 363 मेट्रिक टनांवर गेली होती. आता मात्र बाधितांची संख्या कमी होत असल्याने ऑक्‍सिजनची मागणी 228 मेट्रिक टनांनी म्हणजे तब्बल 63 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. सद्यस्थितीत ही मागणी 134.5 मेट्रिक टन इतकी आहे.

काही दिवसांपूर्वी रुग्णांसाठी ऑक्‍सिजन पुरवताना प्रशासनाची दमछाक झाली. अन्य जिल्ह्यांसह इतर राज्यांमधून ऑक्‍सिजन आणावा लागला होता. तसेच औद्योगिक क्षेत्राचा ऑक्‍सिजनचा वापर पूर्णपणे बंद करून 100 टक्के ऑस्किजन फक्त वैद्यकीय कारणांसाठी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या. तसेच ऑक्‍सिजनची गळती रोखण्यासाठी ऑडिट करण्यात आले.

आता परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल होत असून पुणे विभागात ऑक्‍सिजनची मागणी कमी झाली आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ऑक्‍सिजनची मागणी 341 मेट्रिक टनांनी कमी झाली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये हीच मागणी 611 मेट्रिक टनापर्यंत गेली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.