पुणे : भोगी व मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक फूल बाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक वाढली आहे. जिल्ह्यासह संपूर्ण विभागातून ही आवक होत आहे.
सणाच्या अनुषंगाने बाजारात दाखल झालेल्या फुलांना मागणीही चांगली आहे. परिणामी, गेल्या आठवड्याच्या तुलनेत सर्व प्रकारच्या फुलांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
पुढील दोन दिवस फुलांचे भाव चढेच राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.