पुणे- पुण्यात कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 5 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे पुण्यातील मृतांचा आकडा 13 वर गेला आहे.
पुण्यात आज दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. यात एका 44 वर्षीय पुरुषाचा, तर एका 55 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या पुरुषाला मधुमेहाचाही त्रास होता. तर पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झालेल्या महिलेला एकापेक्षा अधिक आजार होते, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.
दरम्यान, पाच मृत्युंपैकी डॉ. नायडू आणि नोबेल रुग्णालयातील प्रत्येकी एक रुग्ण तर ससून रुग्णालयातील तीन रुग्णांंचा समावेश आहे.