पुणे – स्वच्छतागृहातून एसटी स्थानकात परतणारी 60 वर्षीय महिला शिवशाही बसच्या पाठीमागील चाकाखाली सापडली. या अपघातात तिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी पुणे स्टेशन एसटी स्थानक परिसरात घडली.
गेंदाबाई ज्ञानोबा चौगुले (वय 60, रा. केगाव, सोलापूर) असे मृत्यूमुखी महिलेचे नाव आहे. भानुदास वाडकर (रा. लातूर) या बसचालकाला अटक करण्यात आली आहे. गेंदाबाई यांचा भाऊ मोशीमध्ये राहतो. त्याल्या भेटण्यासाठी गेंदाबाई या पुण्याला आल्या होत्या. त्यांच्यासमवेत त्यांची मुलगी राणी इगवे व काही नातेवाईक होते. बुधवारी सायंकाळी ते सोलापुरहून पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकात आले होते. त्यानंतर त्यांना मोशी येथे भावाकडे जायचे होते. एसटीतून उतरल्यानंतर गेंदाबाई तेथील स्वच्छतागृहात गेल्या. तेथून माघारी येताना अपघात झाला.