पुणे – खडकवासला धरणसाखळीत मुसळधार पाऊस ओसरला असला, तरी गेल्या काही दिवसांत संततधार होत आहे. धरणांमधील पाणीसाठा २७.८८ टीएमसी (९५ टक्के झाला आहे. मागील वर्षी हाच पाणीसाठा मागील वर्षी २६.१८ टीएमसी (८९ टक्के) होता.
यंदा जुलै-आॅगस्टमध्येच खडकवासला धरणसाखळी भरल्याने शहर तसेच ग्रामीण भागाची पाण्याची समस्या सुटली आहे. तर आतापर्यंत खडकवासला धरणासाखळी १७.८६ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहेत. हे पाणी वरगाव, टेमघर आणि खडकवासला धरण १०० टक्के भरेल एवढे आहे.
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत शनिवारपासून अधूनमधून पावसाला सुरूवात झाली आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी पाचपर्यंत खडकवासला धरणात २, पानशेत १५, तर वरसगाव धरणांच्या पाणलोट क्षेत्रात १४, तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर खडकवासला धरणात ९१ टक्के, पानशेत धरणात ९६ टक्के, वरसगाव धरणात ९४ टक्के पाणीसाठा असून टेमघर धरण १०० टक्के भरले आहे.