पुणे – डी.टी.एड., डी.एल.एड. परीक्षेसाठी 35, 353 अर्ज

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या जूनमध्ये घेण्यात येणाऱ्या डी.टी.एड. व डी.एल.एड परीक्षेसाठी आतापर्यंत एकूण 35 हजार 353 विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज अध्यापक विद्यालयांनी दाखल केले आहेत. अतिविलंब शुल्कासह येत्या 23 एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी सन 2004 व 2016 च्या अभ्यासक्रमासाठी अध्यापक शिक्षण पदविका परीक्षा (डी.टी.एड.) व प्राथमिक शिक्षण पदविका परीक्षा (डी.एल.एड.) घेण्यात येतात. यंदाच्या परीक्षांसाठी राज्यातील एकूण 755 अध्यापक विद्यालयांनी नोंदणी केलेली आहे. नियमित शुल्कासह परीक्षांचे अर्ज नोंदणी करण्यासाठी 13 ते 26 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर 27 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी संधी देण्यात आली होती. त्यानंतर 3 एप्रिलपासून अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे.

डी.टी.एड. व डी.एल.एड. साठी 7 ते 17 जून या कालावधीत परीक्षा होणार आहे. डी.टी.एड.च्या प्रथम वर्षाच्या परीक्षेसाठी 126 तर द्वितीय वर्षाच्या परीक्षेसाठी 5 हजार 717 अशा एकूण 5 हजार 843 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यात आले आहेत. डी.एल.एड.च्या प्रथम वर्षाच्या परीक्षेसाठी 14 हजार 269 तर द्वितीय वर्षाच्या परीक्षेसाठी 15 हजार 241 अशा एकूण 29 हजार 510 विद्यार्थ्यांचे अध्यापक विद्यालयांनी अर्ज दाखल केलेले आहेत.

डी.टी.एड. ची जूनमध्ये होणारी शेवटची परीक्षा आहे. यानंतर डी.टी.एड. बंद होणार आहे. त्यामुळे प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या अर्जांची संख्या ही खूपच कमी असल्याचे आढळून येत आहे. पूर्वीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचेही पुन्हा परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.