पुणे – पुण्यातील डीफेन्स इन्स्टिट्यूट अॉफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी (डीआयएटी) यांनी भारतभर सायबर संरक्षण क्षमता वाढवण्याच्या सरकारच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून सायबर कमांडोसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे.
हा उपक्रम भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर, गृह मंत्रालय, केंद्र सरकारच्या अलीकडील सल्ल्यानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोलीस दलांमध्ये सायबर कमांडोजच्या विशेष विंग्सची स्थापना करण्यासाठी वाढत्या सायबर धोक्यांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी महत्त्वाचे आहे.
सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दि. ५ नोव्हेंबरला डीआयएटी येथे करण्यात आले. यावेळी डॉ.बी.एच.व्ही. एस. नारायणमूर्ती यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी प्रमुख पाहुणे गृहमंत्रालयातील सीईओ राजेशकुमार आणि डीआरडीओतील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. जी. अथिथन आदी उपस्थित होते. सायबर कमांडोजसाठी प्रशिक्षणाची पहिली तुकडी भारतातील सुमारे नऊ संस्थांमध्ये एकाच वेळी सुरू झाली.
विविध सायबर धोक्यांना तोंड देण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा वाढवण्यासाठी आवश्यक कौशल्ये सहभागींना सुसज्ज करण्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. या सखोल प्रशिक्षण कार्यक्रमात विविध केंद्रीय आणि राज्य पोलीस दलातील अधिकारी सहभागी होणार आहेत.
सहभागींना सायबरसुरक्षा, सुरक्षा घटनांचे व्यवस्थापन, जटिल सायबर धोक्यांना संबोधित करण्यासाठी सुसज्ज करणे आणि अनेक क्षेत्रांमध्ये मजबूत संरक्षण यंत्रणा लागू करणे या विविध पैलूंमध्ये सर्वसमावेशक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
डॉ. नारायण मूर्ती यांनी सर्व पाहुण्यांचे आणि सहभागींचे स्वागत या कोर्सद्वारे डीआयएटी मध्ये अतिशय सखोल प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
त्यांनी संगणक विज्ञान विभाग आणि अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. मनीषा नेने आणि भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने हा महत्त्वाचा राष्ट्र निर्माण कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले. याप्रसंगी डॉ. जी. अथिथन यांनी आज राष्ट्रीय सुरक्षेत सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले. ज्या भूमिकांसाठी सहभागींना प्रशिक्षित केले जाणार आहे आणि त्या प्रत्येक भूमिकेसाठी सामग्री समाविष्ट केली जाईल याची रूपरेषा देखील त्यांनी दिली.