पुणे – मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील अंबरनाथ स्थानक येथील पुलाच्या कामानिमित्त येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी ट्रॅफीक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, वेळापत्रक बदलल्याने उत्तरेकडे जाणाऱ्या काही गाड्यांचे एप्रिलपासूनच्या पुढील तारखांचे बुकिंग थांबवण्यात येणार आहे.
12 डिसेंबर रोजी धावणारी पुणे-सीएसएमटी (02015) आणि 13 डिसेंबर रोजी धावणारी सीएसएमटी-पुणे (02016) ही गाडी रद्द केली आहे. तर 13 डिसेंबर रोजी जयपूर-पुणे विशेष गाडी काम सुरू असेपर्यंत कल्याण स्टेशन येथे थांबवण्यात येणार आहे. काम संपल्यानंतर पुण्याकडे रवाना होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गाड्यांच्या बुकिंगला स्थगिती
रेल्वे गाड्यांची वेळ, टर्मिनस आणि क्रमांक बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांचे बुकिंग स्थगित करण्यात येणार आहे. यामध्ये एलटीटी-गोरखपूर, एलटीटी-मंडुआडीह या मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. या गाडीचे बुकिंग पुन्हा सुरू करण्याची सूचना योग्यवेळी देण्यात येणार आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा